Sangli Flood

by RedPixel Advertising


Social

free



सांगली महापूर मदत समिती, सांगली या समितीमध्ये सर्व आपत्ती घटनांच्या अनुभवातून व्यापारी, नागरिक, तरुण मंडळे व स्वयंसेवी सामाजिक संस्था, विविध संघटना एकत्र येऊन स्वेच्छेनं या समितीमध्ये आपला सक्रिय सहभाग मोठ्या उत्स्फूर्तपणे नोंदवत आहेत.यापुढे जाऊन पूरग्रस्तांसाठी तात्पुरती निवारा केंद्र, वैद्यकीय सेवा, जनावरांसाठी तात्पुरत्या चारा छावण्या, व्यापाऱ्यांच्या मालाची वाहतूक व सुरक्षितता यामध्ये समन्वय व मदत हि पुरवली जाणार आहे. पूर ओसरल्यानंतर कचरा उठाव, औषध फवारणी यंत्रणा, आरोग्य शिबिरे आयोजित करून सांगली शहराचे जनजीवन तात्काळ पूर्वपदावर आणण्यासाठी समिती काम करणार आहे. यासाठी गरज आहे लोकसह्भागा बरोबरच नागरिकांच्या विश्वासार्हतेची! आपण सर्वानी मिळून आपलं सांगली शहर नेहमी सुरक्षित, स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी कटिबद्ध राहूया !